अडकलेली व्यथा!

अडकलेली व्यथा!

 

सांगून नाही कळणार,

तूला माझी व्यथा!

सांगूनही उपयोग काय?!

तूला तर माहितच

नाहिए माझी कथा…!

इवलेसे अश्रु …..

दिसतातच लगे तूला…

काय झालय?! का रडतेस?!

असं विचारतोसही मला….

पण खरच सांगते…,

सांगून नाही कळणार…

तुला माझा ओलावा!

कारण पाहू शकतोस तू…

फक्त सागराचा किनारा!

गच्च मिटलेले ओठ….

आणि डोळे…

सारे काही दिसूं शकते तूला….,

तेंव्हा हळूच चोरून,

पूसतोसही मला…

“काय झालय?” ….

“काय त्रास होतोय?”….

……,……

पण खरच सांगते…

सांगून नाही कळणार….,

तूला माझ्या रेषा…

कारण त्या लिहील्याच

अशा आहेत की….,

कळूच नये तूला !

  • सौ. अपर्णा नि. काकिर्डे.
Continue Reading

डाव बुद्धीबळाचा

डाव बुद्धीबळाचा

डाव मांडला बुद्धीबळाचा,

हत्ती, घोडे, महारथींचा…।।

विषय थोडका, नीत्त्य वेगळा,

एककटाक्षी न दिसे कूणाला।

डाव रंगला, विषय दंगला…

हत्तीघोड्यांसवे उंटही गूंतला।

वज़ीर कूणाचा, विषय थोडका,

“कोण-वाचावा” हा प्रश्न नेमका।

विषयच मूळी आक्रमणाचा

अन् पर्वाही नसे कोण-कूणाचा!!

डाव संपला भासे मनाला…

पुन्हा जींकणे न उरे कूणाला!!

हार जिंकणे न ठाव मनाला

खेळ संपला हेच सांगे जीवाला।।

  • सौ. अपर्णा काकिर्डे
Continue Reading

सांग दर्पणा…..

 सांग दर्पणा…..

सांग दर्पणा कशी मी दिसते,

नाते तूझ्याशी जगावेगळे……

गोपीकांचा मुरलीधर तू,

तुला कूणीही सखा नसे अन्

राधिकाही तुझी नसे….

सांग दर्पणा कशी मी दिसते?

योगीयांचाही योगेश्वर तू

असत्याशी कधी संग नसे 

अन् सत्याचाही गर्व नसे

सांग दर्पणा कशी मी असे….

देवघरात कूणी तूला न पूजे,

माजघराची तू शान असे…

भावनेलाही भावुक करूनी, 

मेनकेचा तू वैरागी असे…

प्रभातकिरणे तुला स्पर्शूनी 

धन्य होऊनी नव उज़ळीतसे

ज्ञानीयांचाही ज्ञानेश्वर तू

अप्सरेच्या महाली वसे 

सांग दर्पणा कशी मी दिसे!!

नीतळ नीरासम अस्तित्व तूझे

हे खडा मारीता मोडीत असे

कटियार बनूनी मग भाविकेला 

नवे रूप तुझे दावीतसे….

सांग दर्पणा कशी मी दिसे?

  • अपर्णा काकिर्डे
Continue Reading

अबोल व्यक्त….

अबोल ज़री, व्यक्त तरी!

व्यक्त होऊनी, नवी उरी! ।।१।।

नवी उरी तीच, मूक्त करी

मूक्ततेचीच, आस खरी! ।।२।।

आस जगाला, भास करी

तूझी आस ती, तुला खरी! ।।३।।

नको तयाचा विचार करी..

तूझी आस तू साकार करी ।।४।।

नार नवेली, ती आस खरी

ऊँच भरारीच मूक्त करी! ।।५।।

घे ती भरारी! ऊँच विहारी!

नकोच भीती…तूझ्या उरी! ।।६।।

ऊँच नजरेतली दूनीया सारी

दिसेलच तुला, तूझीच प्यारी! ।।७।।

तूझीच प्यारी.. तूझीच न्यारी

दिसे ती पून्हा..स्वप्नी सारी..! ।।८।।

सौ. अपर्णा काकिर्डे.

Continue Reading

नि:शब्द !!

निशब्द !!

शब्दात तूझ्या रमले मी,
तळ गाठायला हरले मी।।

शब्द तूझा तो रानवनीचा,
गर्द काळोखी हरवले मी ।।

तोच दिलासा, शब्द मला,
शब्द जगायला शीकले मी ।।

तूझ्याचसाठी जगले मी,
वास्तव जगायला शीकले मी ।।

एकच मागणे असे तूला,
जो शब्दहार सजले मी..।

पून्हा न कधी ते दे कूणा,
शब्दात तूझ्या रमले मी !।

सौ. अपर्णा काकिर्डे.

Continue Reading

एक मोगरा….

एक मोगरा….

एक मोगरा कधी न फूलला,
निवडूंगांच्या चौकटीत अडकला।।१।।

प्राक्तन त्याचे न फूलण्याचे,
पाण्याविनाच ते न जगण्याचे ।।२।।

तरी एकदा चमत्कार झाला,
एक कळीचा बहर तो आला ।।३।।

रंग कळीचा आगळावेगळा
पण तोच सुगंध मोहाळलेला ।।४।।

एक कवडसा तो आसावलेला,
कटार-काट्यांनी भेदून गेला ।।५।।

बहर-सोहळा साजरा झाला,
फूलण्याआधीच पहारा झाला ।।६।।

शापित-प्राक्तन न फूलण्याचे,
निवडूंग चौकटीत कोमेजण्याचे ।।७।।

काट्यांचाच तो आघात झाला,
कळीला तो सहन न झाला ।।८।।

प्राक्तन कळीचे न फूलण्याचे,
हार जींकणे न समजण्याचे ।।९।।

पहारेकर्यावर दोष न आला,
चौकटीचाच तो क़ायदा झाला ।।१०।।
– सौ. अपर्णा नि. काकिर्डे.

Continue Reading

ती पंचायती-शांतता……!!

ती पंचायती-शांतता……!!

तो दरबार माझा होता, तो क़ायदा माझा होता!!

शांततेला दयाहत्येचा न्याय होता….

पण ही दयाहत्या खरतर कूणाची ?

फ़ार वर्षांपूर्वी इथे एक पंचायत भरायची!

चव्हाट्यावर! ती पंचायत आता गहाळ होती…

आणि ती कधीच भरणारही नव्हती……

पण एका वंचिताची पाठपूरावा हजेरी,

आणि त्याची ती मौल्यवान जूनी चंची..

त्या घरंदाज वटवृक्षापाशी नेहमी विसावायची,

मूक्तीची आस क़ायमच होती त्याची…..

पण जपलेली काही देणीही बाक़ी होती!

आशेच भाबडं पाखरू वाट बघत होत मूक्तीसाठी..

आसूसलं होतं उंच मोकळ्या भरारीसाठी!!!

पण ती पंचायत आता कधीच भरणार नव्हती,

कारण तीची जागा आता बाजाराने घेतली होती,

चव्हाट्यावर बाज़ार पसरला होता…..,

बाजार!!! बाज़ार शोभूनच दिसत होता,

विविध रंगांमध्ये नटलाही होता..नव्हे!…

विविधतेच्या सौंदर्यस्पर्धेत नटला होता!

तो दरबार माझा होता, तो बाजार माझा नव्हता!

चव्हाट्यावर बाज़ार पसरला होता,

पण मनात मात्र ..ती पंचायती-शांतता….

त्या थंडगार वटव्रूक्षापाशी विसावलेली!

Continue Reading