ती पंचायती-शांतता……!!

ती पंचायती-शांतता……!!

तो दरबार माझा होता, तो क़ायदा माझा होता!!

शांततेला दयाहत्येचा न्याय होता….

पण ही दयाहत्या खरतर कूणाची ?

फ़ार वर्षांपूर्वी इथे एक पंचायत भरायची!

चव्हाट्यावर! ती पंचायत आता गहाळ होती…

आणि ती कधीच भरणारही नव्हती……

पण एका वंचिताची पाठपूरावा हजेरी,

आणि त्याची ती मौल्यवान जूनी चंची..

त्या घरंदाज वटवृक्षापाशी नेहमी विसावायची,

मूक्तीची आस क़ायमच होती त्याची…..

पण जपलेली काही देणीही बाक़ी होती!

आशेच भाबडं पाखरू वाट बघत होत मूक्तीसाठी..

आसूसलं होतं उंच मोकळ्या भरारीसाठी!!!

पण ती पंचायत आता कधीच भरणार नव्हती,

कारण तीची जागा आता बाजाराने घेतली होती,

चव्हाट्यावर बाज़ार पसरला होता…..,

बाजार!!! बाज़ार शोभूनच दिसत होता,

विविध रंगांमध्ये नटलाही होता..नव्हे!…

विविधतेच्या सौंदर्यस्पर्धेत नटला होता!

तो दरबार माझा होता, तो बाजार माझा नव्हता!

चव्हाट्यावर बाज़ार पसरला होता,

पण मनात मात्र ..ती पंचायती-शांतता….

त्या थंडगार वटव्रूक्षापाशी विसावलेली!

You may also like