एक मोगरा….

एक मोगरा….

एक मोगरा कधी न फूलला,
निवडूंगांच्या चौकटीत अडकला।।१।।

प्राक्तन त्याचे न फूलण्याचे,
पाण्याविनाच ते न जगण्याचे ।।२।।

तरी एकदा चमत्कार झाला,
एक कळीचा बहर तो आला ।।३।।

रंग कळीचा आगळावेगळा
पण तोच सुगंध मोहाळलेला ।।४।।

एक कवडसा तो आसावलेला,
कटार-काट्यांनी भेदून गेला ।।५।।

बहर-सोहळा साजरा झाला,
फूलण्याआधीच पहारा झाला ।।६।।

शापित-प्राक्तन न फूलण्याचे,
निवडूंग चौकटीत कोमेजण्याचे ।।७।।

काट्यांचाच तो आघात झाला,
कळीला तो सहन न झाला ।।८।।

प्राक्तन कळीचे न फूलण्याचे,
हार जींकणे न समजण्याचे ।।९।।

पहारेकर्यावर दोष न आला,
चौकटीचाच तो क़ायदा झाला ।।१०।।
– सौ. अपर्णा नि. काकिर्डे.

You may also like